बर्ट्रांड रसेल - लेख सूची

व्यक्ती विरुद्ध नागरिक

आधुनिक काळात जगातील सर्व सुसंस्कृत समाजांनी शिक्षणाची आवश्यकता स्वीकारलेली आहे. अनेक मान्यवर विद्वानांना हे म्हणणे मान्य नाही. त्यांच्या मते जे उद्देश्य गाठण्याचा दावा शिक्षण करते ते गाठण्यास ते असमर्थ ठरलेले आहे. ह्या मताचा खरेखोटेपणा तपासण्याआधी शिक्षणामुळे काय साध्य व्हावे असे आपल्याला वाटते ह्याचा विचार करायला हवा. शिक्षणाच्या हेतूबद्दल एकवाक्यता नसणे स्वाभाविक आहे पण एका मुद्द्यावर …

अप्रिय मतांचे नियमन

ज्या मूर्ख मतांमुळे सार्वजनिक जीवनाला अपाय होण्याचा संभव नसेल त्याबद्दल कोणाला तुरुंगात घालणे मला अर्थशून्य वाटते. जर हा नियम टोकापर्यंत ताणला तर फारच थोडे लोक त्याच्या तडाख्यातून वाचतील. शिवाय अश्लीलतेचा बंदोबस्त कायदा आणि तुरुंगवास यांनी करण्याने फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होण्याचा संभव आहे. जे केवळ मूर्खपणाचे किंवा दुष्कर्म असेल त्याला मोहक वलय मात्र प्राप्त होते. राजकीय …

बुद्धि आणि भावना

मला केवळ नकारात्मक भावनिक वृत्तीचा उपदेश करायचा नाही. सर्व बलेवान भावनांचा उच्छेद करावा असे मी सुचवीत नाही. ही भूमिका मी फक्त ज्या भावनांवर सामूहिक उन्माद आधारलेले असतात त्यांच्याच बाबतीत घेतो, कारण सामूहिक उन्माद युद्ध आणि हुकूमशाही यांना पोषक असतो. शहाणपणा केवळ बौद्धिक असण्यात नाही. बुद्धी वाट दाखविते आणि मार्गदर्शन करते; पण ज्यातून कृति निर्माण होते …

प्लेटोचे आदर्श राज्य

प्लेटोच्या Republicच्या राज्यशास्त्रीय मतांची भल्या लोकांनी प्रशंसा करावी हे वाङ्मयीन भद्रमानी वृत्तीचे (snobbery) चे अत्यंत आश्चर्यकारक उदाहरण आहे. या एकतंत्री हुकूमशाही प्रबंधाविषयीच्या काही गोष्टी पाहा. शिक्षणाचे मुख्य प्रयोजन युद्धात धैर्य निर्माण करणे हे असून अन्य सर्व गोष्टी त्याला साधनीभूत मानल्या पाहिजेत. याकरिता माता आणि आया यांच्याकडून बालकांना सांगितल्या जाणार्यास गोष्टींची कडक तपासणी केली पाहिजे. होमरचे …

इतरांच्या मताबद्दल आदर

मला जे तत्त्व शिकवायचे आहे, ते स्वैर स्वेच्छाचाराचे नाही. पारंपरिक मतात अभिप्रेत असतो, जवळपास तितकाच आत्मसंयम त्यात अवश्य आहे. परंतु त्यात संयम इतरांच्या स्वातंत्र्यात ढवळाढवळ न करण्याकरिता वापरावा लागेल, आपले स्वातंत्र्य कमी करण्याकरिता नव्हे. आरंभापासून योग्य शिक्षण मिळाल्यास इतरांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वातंत्र्य याबद्दल आदर बाळगणे बरेच सोपे होईल अशी आशा करायला हरकत नाही असे मला …

असे जग निर्मिणे शक्य आहे

जे जग आपल्याला निर्मायचे आहे त्यात सर्जक वृत्ती जिवंत असतील. त्यात जीवन हे आनंद आणि आशा यांनी परिपूर्ण असे साहस असेल. आपल्या जे मालकीचे आहे ते राखण्याच्या किंवा दुसन्याच्या मालकीच्या वस्तू लुबाडण्याच्या नव्हे, तर विधायक प्रवृत्तींवर आधारलेले ते जीवन असेल. त्या जगात स्नेहाला अनिबंध वाव असेल. त्यातील प्रेमातील अधिकारवृत्ती नाहीशी झालेली असेल. त्यातील क्रौर्य आणि …

विश्वाचा हेतू

आपली पृथ्वी विश्वाचा एक लहानसा कोपरा आहे. आणि बाकीचे विश्व इथल्यासारखेच कदाचित् नसेल असे मानायला जागा आहे. अन्यत्र कुठे जीवन असेल हे सर जेम्स जीन्स शंकास्पद मानतात. ईश्वराच्या योजना विशेषतः पृथ्वीशी संबद्ध आहेत असे मानणे कोपर्निकन क्रांतीपूर्वी स्वाभाविक होते, पण आता ती कल्पना अयुक्तिक झाली आहे. जर विश्वाचा हेतू मनाची उत्पत्ती हा आहे असे मानले …

गूढवाद

विज्ञान आणि धर्मशास्त्र यांच्यातील युद्ध चमत्कारिक प्रकारचे राहिले आहे. अठराव्या शतकातील फ्रान्स आणि विसाव्या शतकातील रशिया हे देश सोडले तर सर्वकाळी आणि सर्व स्थळी बहुतेक वैज्ञानिकांनी आपापल्या काळातील सनातनी मतांची पुरस्कार केला होता. अत्यंत प्रसिद्ध वैज्ञानिकांपैकी काही त्या बहुतेकांपैकी होते. न्यूटन जरी एअरियन असला तरी अन्य सर्व बाबतींत त्याचा ख्रिस्ती धर्माला पाठिंबा होता. कूव्हिअर हा …

बौद्धिक स्वातंत्र्याचे महत्त्व

ज्यांना बौद्धिक स्वातंत्र्य स्वतःकरता महत्त्वाचे वाटते असे लोक समाजात अल्पसंख्येत असतील, पण भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे लोक त्यांच्यामध्ये आहेत. आपण कोपर्निकस, गॅलिलिओ आणि डार्विन यांचे मानवाच्या इतिहासात महत्त्व पाहिले आहे, आणि अशी माणसे भविष्यात निर्माण होणार नाहीत असे मानायचे कारण नाही. जर त्यांना आपले काम करू देण्यापासून प्रतिबंध केला आणि त्याचे परिणाम होऊ दिले नाहीत, …

पुरुषी वर्चस्वाचे दुष्परिणाम

पुरुषी वर्चस्वाचे काही अनिष्ट परिणाम झाले आहेत. मानवी संबंधांपैकी जो अत्यंत जिव्हाळ्याचा – म्हणजे विवाहाचा – त्याला दोन समान भागीदारांतील संबंधाऐवजी स्वामी आणि दास या संबंधाचे रूप त्यामुळे प्राप्त झाले. स्त्रीला आपली पत्नी म्हणून प्राप्त करण्यासाठी तिला सुखविण्याची गरज वाटेनाशी झाली, आणि त्यामुळे प्रियाराधनेचे क्षेत्र विवाहबाह्य संबंध असे ठरले. कुलीन स्त्रियांवर लादल्या गेलेल्या चार भिंतींमधील …

वैज्ञानिक रीत

आपल्या समजुतींतील सत्याची मात्रा वाढविण्याचे उपाय प्रसिद्ध आहेत. त्यांत कोठल्याही गोष्टीच्या सर्व बाजू लक्षात घेणे, सर्व संबद्ध वास्तवे निश्चित करण्याचा प्रयत्न करणे, आपले पूर्वग्रह विरुद्ध पूर्वग्रह असणार्‍या लोकांशी चर्चा करून दुरुस्त करणे, आणि अपुरा सिद्ध झालेल्या कोणत्याही उपन्यासाचा (hypothesis) त्याग करण्याची तयारी जोपासणे – यांचा त्यांत समावेश होतो. या रीतींचा वापर विज्ञानात केला जातो, आणि …

सहजप्रवृत्तीचे प्रशिक्षण

आपल्या स्वाभाविक प्रवृत्ती चांगल्याही नसतात आणि वाईटही नसतात; नैतिकदृष्ट्या त्या उदासीन असतात. त्यांना इष्ट वळण देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असावे. जुनी ख्रिस्ती लोकांना प्रिय असणारी पद्धत सहजप्रवृत्तींना प्रतिबंध करण्याची होती, परंतु नची पद्धत त्यांना प्रशिक्षित करण्याची आहे. उदाहरणार्थ सत्तेची इच्छा घ्या. ख्रिस्ती नम्रता (humility) शिकविणे व्यर्थ आहे; त्यामुळे ती प्रवृत्ती दांभिक रूपे धारण करते एवढाच …

शिक्षणातील स्वातंत्र्य

शिक्षणातील स्वातंत्र्याला अनेक बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे शिकावे की न शिकावे ह्याचे स्वातंत्र्य. नंतर काय शिकावे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य. आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणात मताचे स्वातंत्र्य. शिकावे की न शिकावे ह्याचे स्वातंत्र्य बाल्यावस्थेत अंशतःच देता येईल. जे मूढमती नाहीत अशा सर्वांना लिहितावाचता आले पाहिजे. हे केवळ संधी दिल्याने कितपत साध्य होईल हे अनुभवानेच कळेल; परंतु …

निसर्गाकडे परत चला!

आपल्या परिचयाच्या गोष्टी आहेत. परंतु यांत नवीन काही नाही. कन्फ्यूशिअसपूर्वी इ. पू. सहाव्या शतकात होऊन गेलेल्या लाओत्सेनेही आधुनिक यंत्रांनी केलेल्या प्राचीन सौंदर्याच्या नाशाबद्दल रस्किनइतक्याच तळमळीने तक्रारी केल्या आहेत. रस्ते, पूल आणि बोटी या अनैसर्गिक असल्यामुळे त्याला भयावह वाटत. आजचे उच्चभ्रू लोक ज्या भाषेत सिनेमाविषयी बोलतात त्या भाषेत तो संगीताविषयी बोले. आधुनिक जीवनातील घाई चिंतनशील वृत्तीला …

कोणती वैवाहिक नीती अधिक चांगली

कोणत्याही देशांतील बहुसंख्य लोकांची अशी पक्की खात्री असते की आपल्या देशातील विवाहसंस्था सोडून अन्य सर्व विवाहसंस्था अनैतिक आहेत, आणि जे लोक असे मानीत नाहीत त्यांना आपल्या स्वैर जीवनाचे समर्थन करावयाचे असते असे ते समजतात. भारतात विधवांचा पुनर्विवाह ही गोष्ट परंपरेने अत्यंत भयंकर मानली गेली आहे. कॅथलिक देशात घटस्फोट पाप मानला जातो, पण वैवाहिक दुर्वर्तन, निदान …

आपण काय करावे?

आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि जगाकडे ताठ मानेने पाहिले पाहिजे. जगातील चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, त्यातील सौंदर्य आणि कुरूपता- या सर्व जशा आहेत तशा निर्भयपणे आपण स्वीकारल्या पाहिजेत. जग बुद्धीने जिंकायचे आहे, त्यातील भयप्रद गोष्टींनी गुलामांप्रमाणे पराभूत होऊन नव्हे. परमेश्वराची सबंध कल्पना पूर्वेकडील सर्वशक्तिमान हुकूमशहांच्या अनुभवातून निर्माण झालेली असून ती स्वतंत्र मनुष्याला मुळीच …

विवाह आणि नीती (भाग १९)

आपल्या चर्चेतून आपण काही निष्कर्षाप्रत आलो आहोत. यांपैकी काही निष्कर्ष ऐतिहासिक आहेत, तर काही नैतिक आहेत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता आपल्याला असे आढळले की आज नागरित समाजात लैंगिक नीती ज्या स्वरूपात आहे, ते स्वरूप तिला दोन भिन्न स्रोतांमधून प्राप्त झाले आहे. एका बाजूला पितृत्व निश्चित करण्याची पुरुषांची इच्छा, आणि दुसर्‍या बाजूला प्रजननाखेरीज अन्यत्र लैंगिक संबंध पापमय …

सत्यप्राप्तीचे उपाय

आपल्या मतांपैकी एकही पूर्णपणे सत्य नसते. प्रत्येकाभोवती संदिग्धता आणि भ्रांती यांचे वलय असते. आपल्या मतांतील सत्याची मात्रा वाढविण्याचे उपाय सुविदित आहेत. सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे, आपल्या पूर्वग्रहांविरुद्ध पूर्वग्रह असलेल्या लोकांशी चर्चा करणे, आणि जो उपन्यास (hypothesis) अपर्याप्त सिद्ध होईल त्याचा त्याग करण्याची तयारी ठेवण्याची मनोवृत्ती अंगी बाणवणे – हे ते उपाय होत. या उपायांचा …

विवाह आणि नीती (भाग १८)

मानवी मूल्यांत कामप्रेरणेचे स्थान कामप्रेरणेविषयी लिहिणार्‍या लेखकांवर, या विषयाची वाच्यता करू नये असे मानणार्‍या लोकांकडून, त्याला ह्या विषयाचा ध्यास लागलेला आहे असा आरोप होण्याची भीती नेहमीच असते. या विषयात त्याला वाटणारा रस त्याच्या महत्त्वाच्या तुलनेत प्रमाणाबाहेर असल्यावाचून फाजील सोवळया लोकांकडून होणारी टीका तो आपल्यावर ओढवून घेणार नाही असे मानले जाते. परंतु ही भूमिका रूढ नीतीत …

खरी वैज्ञानिक वृत्ती

वैज्ञानिक वृत्तीचे अलीकडच्या काळातील एक अतिशय लक्षणीय उदाहरण म्हणजे सापेक्षतेच्या उपपत्तीचा सबंध जगाकडून झालेला स्वीकार, आइन्स्टाइन नावाच्या एका जर्मन-स्विस्-ज्यू शांततावाद्याची जर्मन शासनाने संशोधक प्राध्यापक म्हणून पहिल्या महायुद्धाच्या आरंभीच्या काळात नेमणूक केली होती. त्याने वर्तविलेलेली भविष्ये युद्धविरामानंतर १९१९ साली झालेल्या ग्रहणाच्या इंग्लिश अभियानाने केलेल्या निरीक्षणांनी खरी ठरली. त्याच्या उपपत्तीने सबंध प्रस्थापित भौतिकीची उलथापालट झाली. डार्विनने बायबलला …

विवाह आणि नीती (भाग १७)

‘कामप्रेरणा आणि व्यक्तीचे हित’ या प्रकरणात कामप्रेरणा आणि लैंगिक नीती यांच्या व्यक्तीचे हित आणि सुख यावर होणाऱ्या परिणामांविषयी यापूर्वीच्या प्रकरणांत जे लिहिले आहे त्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा विचार आहे. या ठिकाणी मानवी जीवनाचा कामप्रेरणा प्रबळ असण्याचा काळ किंवा प्रत्यक्ष लैंगिक संबंध यांच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. लैंगिक नीतीचे बाल्य, कुमारावस्था(adolesence), आणि वार्धक्यही यांवर विविध प्रकारांनी परिणाम होत …

विवेकवाद – १९

मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय प्रकरण १८ सुप्रजननशास्त्र सुप्रजननशास्त्र म्हणजे एखाद्या जीवजातीचा मुद्दाम हेतुपूर्वक वापरलेल्या जीवशास्त्रीय उपायांनी उत्कर्ष घडवून आणण्याचा प्रयत्न. या प्रयत्नाची आधारभूत कल्पना डार्विनवादी आहे, आणि सुप्रजननशास्त्रीय संघटनेचा अध्यक्ष चार्ल्स डार्विनचा पुत्र आहे हे उचितच आहे. परंतु सुप्रजननशास्त्राच्या कल्पनेचा जनक फ्रॅन्सिस गॉल्टन हा होता, गॉल्टनने मानवी संपादतात (achievement) अनुवांशिक घटकांवर विशेष …

विवाह आणि नीती (भाग १६)

लोकसंख्या ‘विवाहाचे प्रमुख प्रयोजन म्हणजे पृथ्वीवरली मानवाची संख्या भरून काढणे, काही विवाहव्यवस्थांत हे प्रयोजन अपुऱ्या प्रमाणात साधले जाते, तर काही जास्तच प्रमाणात ते पुरे करतात. या प्रकरणात मी लैंगिक नीतीचा विचार या दृष्टिकोणातून करणार आहे. व नैसर्गिक अवस्थेत मोठ्या सस्तन प्राण्यांना जिवंत राहण्याकरिता दरडोई बराच मोठा भूभाग लागतो. त्यामुळे मोठ्या सस्तन प्राण्यांच्या कोणत्याही जातीत प्राणिसंख्या …

विवाह आणि नीती (भाग १५)

घटस्फोट बहुतेक सर्व देशांत आणि बहुतेक सर्व युगांत घटस्फोटाला काही कारणांकरिता संमती होती. घटस्फोटाची संकल्पना एकपतिक-एकपत्नीक (monogamous) कुटुंबाचा पर्याय म्हणून कधीच केली गेली नाही. त्याचा उद्देश जिथे विवाहितावस्था कायम ठेवणे असह्य झाले असे वाटते तिथे क्लेश कमी करणे हाच राहिला आहे. या विषयातील कायदा भिन्न देशांत आणि भिन्न काळी अतिशय भिन्न राहिलेला आहे. आजही एकट्या …

विवाह आणि नीती (भाग १४)

कुटुंब आणि शासनसंस्था जारी कुटुंबाची मुळे जीवशास्त्रीय असली तरी नागरित (civilised) समाजांमधील कुटुंब ही कायद्याने निर्मित अशी गोष्ट आहे. विवाहावर कायद्याचे नियंत्रण असते. आणि मातापित्यांचे अपत्यांवरील अधिकार अतिशय बारकाव्याने निश्चित केलेले असतात. विवाह झालेला नसेल तर पित्याला कुटुंबात कसलाही हक्क नसतो, आणि अपत्यावर एकट्या मातेचा अधिकार चालतो. परंतु जरी कायद्याचा उद्देश कुटुंबाचे रक्षण करणे हा …

विवाह आणि नीती (भाग १३)

कुटुंब आणि वैयक्तिक मानसशास्त्र या प्रकरणात मी व्यक्तीच्या शीलावर (character) कौटुंबिक संबंधांचा काय परिणाम होतो याचा विचार करणार आहे. या विषयाचे तीन स्वाभाविक भाग पडतातः मुलांवर होणारे परिणाम, मातेवर होणारे परिणाम, आणि पित्यावर होणारे परिणाम. हे तीन परिणाम वेगळे करणे अर्थातच कठीण आहे, कारण कुटुंब हे एक सुसंहत एकक (closely – knit unit) असते, आणि …

विवाह आणि नीती (भाग १२)

आजचे कुटुंब आपण प्रकरण २ आणि ३ यांत मातृवंशीय आणि पितृसत्ताक कुटुंब आणि लैगिक-नीतिविषयक प्रारंभिक कल्पनांवर त्यांचा परिणाम यांचा विचार केला याचे वाचकाला एव्हाना विस्मरण झाले असेल. ती कुटुंबविषयक चर्चा फिरून सुरू करण्याची वेळ आता आली आहे, कारण लैंगिक स्वातंत्र्यावर निर्बध घालण्याचा एकमेव विवेकी आधार कौटुंबिक जीवनात आढळतो. कामवासना आणि पाप यांच्यावरील दीर्घ चर्चा आता …

मुक्त मानवाची पूजा

[‘A Free Man’s Worship’ हा बरट्रॅंड रसेलच्या अत्युत्प्ट लिखागांपैकी एक निबंध. तो त्याने १९०२ साली म्हणजे वयाच्या तिसाव्या वर्षी लिहिला. हा निबंध म्हणजे एक तसदर काव्य हे झार तसेच ते विश्वाचे आणि मानव जीवनाचे अतिशय मार्मिक दर्शनही आहे. हे विश्व निर्हेतुक आहे, निष्प्रयोजन आहे, त्यात मानवाची उत्पत्तीही तशीच अर्थहीन, प्रयोजनहीन आहे, हे विश्व मानवाच्या झाकांक्षाविषयी …

विवाह आणि नीती (भाग ११)

वेश्यावृत्ती जोपर्यंत प्रतिष्ठित स्त्रियांचे पातिव्रत्य ही गोष्ट महत्त्वाची मानली जाते तोपर्यंत विवाहसंस्थेला आणखी एका पूरक संस्थेची जोड द्यावी लागते, किंबहुना ही पूरक संस्था विवाहसंस्थेचाच भाग मानावा लागेल. मला अभिप्रेत असलेली संस्था म्हणजे वेश्यासंस्था होय. लेकी ज्या परिच्छेदात वेश्यावृत्ती गृहाच्या पावित्र्याची आणि पत्न्या आणि कन्या यांच्या शुचितेची रक्षक आहे असे म्हणतो तो प्रसिद्ध आहे. त्यात व्यक्त …

विवाह आणि नीती (भाग १०)

विवाह या प्रकरणात मी विवाहाची चर्चा केवळ स्त्रीपुरुषांमधील संबंध या दृष्टीने, म्हणजे अपत्यांचा विचार न करता, करणार आहे. विवाह ही कायदासंमत संस्था आहे हा विवाह आणि अन्य लैंगिक संबंध यांतील भेद आहे. विवाह ही बहुतेक सर्व देशांत एक धार्मिक संस्थाही असते, पण ती कायदेशीर आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आदिम मानवांतच केवळ नव्हे तर वानरांत …

विवाह आणि नीती (भाग ९)

मानवी जीवनात प्रेमाचे स्थान बहुतेक सर्व समाजांची प्रेमविषयक अभिवृत्ती (attitude) दुहेरी राहिली आहे. एका बाजूला प्रेम काव्य, कादंबरी आणि नाटक यांचा प्रमुख विषय आहे; आणि दुसऱ्या बाजूला बहुतेक समाजशास्त्रज्ञांचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असते, आणि आर्थिक किंवा सामाजिक सुधारणांच्या योजनांत प्रेमाचा समावेश अभीष्ट उद्देशात केला जात नाही. मला ही अभिवृत्ती समर्थनीय वाटत नाही. प्रेम ही मानवी …

विवाह आणि नीती (भाग ८)

लैंगिक ज्ञानावर प्रतिषेध (Taboo) (उत्तरार्ध) या प्रकरणात मी लैंगिक आचार कसा असावा याचा विचार करीत नसून, लैंगिक विषयांच्या ज्ञानासंबंधी आपली अभिवृत्ती (attitude) काय असावी याचा विचार करतो आहे. अल्पवयीन मुलांना लिंगविषयक ज्ञान देण्याच्या संबंधात आतापर्यंत मी जे म्हटले त्यास सर्व प्रबुद्ध आधुनिक शिक्षणतज्ज्ञांची सहानुभूती माझ्या बाजूने आहे अशी मला आशा आणि विश्वासही आहे. परंतु आता …

विवाह आणि नीती (भाग ८)

लैंगिक ज्ञानावर प्रतिषेध [taboo] (पूर्वार्ध) नवीन लैंगिक नीतीची रचना करताना विचारायचा पहिला प्रश्न: ‘लैंगिक संबंधांचे नियमन कसे करावे?’ ही नाही. तो ‘पुरुष, स्त्रिया आणि मुले यांना लैंगिक विषयासंबंधी कृत्रिम अज्ञानात ठेवणे इष्ट आहे काय?’ हा आहे. या प्रश्नाला पहिले स्थान देण्याचे माझे कारण असे आहे की, मी या प्रकरणात दाखविण्याचा यत्न करणार असल्याप्रमाणे, लैंगिक विषयातील …

विवाह आणि नीती (भाग ७)

स्त्रीमुक्ती लैंगिक नीती सध्या संक्रमणावस्थेत आहे याची मुख्यतः दोन कारणे आहेत. पहिले, संततिप्रतिबंधाच्या साधनांचा शोध, आणि दुसरे, स्त्रियांची मुक्ती. यांपैकी पहिल्या कारणाचा विचार मी नंतर करणार आहे; दुसरा या प्रकरणाचा विषय आहे. स्त्रियांची मुक्ती हा लोकशाही चळवळीचा भाग आहे. तिचा जन्म फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात झाला. आपण वर पाहिल्याप्रमाणे या राज्यक्रांतीत वारसाहक्कविषयी कायद्यात कन्यांना अनुकूल असा …

विवाह आणि नीती (भाग ६)

कल्पनात्म प्रेम (Romantic Love) ख्रिस्ती धर्म आणि बर्बर टोळ्या यांच्या विजयानंतर म्हणजे रोमन नागरणाच्या (civilization) पराजयानंतर स्त्री आणि पुरुष यांचे संबंध कित्येक शतकांत गेले नव्हते अशा पशुतेच्या पातळीवर गेले. प्राचीन जग दुराचारी होते, पण ते पाशवी नव्हते. तमोयुगांत धर्म आणि बर्बरता यांनी संगनमत करून जीवनाच्या लैंगिक अंगाचा अधःपात घडवून आणला, विवाहात पत्नीला कसलेच हक्क नव्हते; …

विवाह आणि नीती (भाग ५)

ख्रिस्ती नीती‘विवाहाची मुळे कुटुंबात रुजलेली आहेत, कुटुंबाची विवाहात नाहीत’ असे वेस्टरमार्क म्हणतो. हे मत ख्रिस्तपूर्व काळात उघडे सत्य म्हणून स्वीकारले गेले असते; परंतु ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर ते एक महत्त्वाचे विधान झाले असृन त्याचे प्रतिपादन त्यावर जोर देऊन करावे लागते. ख्रिस्ती धमनि, आणि विशेषतः सेंट पॉलने, विवाहाविषयी एक अगदी नवीन कल्पना मांडली: ती अशी की विवाह …

विवाह आणि नीती (भाग ४)

लिंगपूजा, तापसवाद आणि पाप जेव्हा पितृत्वाचा शोध लागला त्या क्षणापासून धर्माला लैंगिक व्यवहारात मोठा रस उत्पन्न झाला. हे अपेक्षितच होते; कारण जे जे गूढ आहे आणि महत्त्वाचे आहे अशा सर्व गोष्टींत धर्म रस घेतो. कृषीवलावस्था आणि मेंढपाळ अवस्था यांच्या आरंभीच्या काळात राहणाऱ्या मनुष्यांच्या दृष्टीने सुपीकपणा, मग तो जमिनीचा असो, गुराढोरांचा असो, किंवा स्त्रियांचा असो, ही …

विवाह आणि नीती (भाग ३)

पितृसत्ताक व्यवस्था पितृत्व या शरीरशास्त्रीय गोष्टीची ओळख पटल्याबरोबर पितृत्वाच्या भावनेत एक नवीन घटक प्रविष्ट झाला आणि त्यामुळे जवळजवळ सगळीकडे पितृसत्ताक समाजांची निर्मिती घडून आली. अपत्य हे आपले ‘बीज’ आहे हे ओळखल्याबरोबर पित्याच्या अपत्यविषयक भावकंदाला (sentiment) दोन गोष्टींमुळे नवे बळ लाभते – अधिकाराची आवड आणि मृत्यूनंतर जीवनाची इच्छा. आपल्या वंशजांचे पराक्रम हे एका अर्थाने आपलेच पराक्रम …

विवाह आणि नीती (भाग २)

मातृवंशीय समाज वैवाहिक रूढींमध्ये नेहमीच तीन घटकांचे मिश्रण आढळते: (१) साहजिक किंवा सहजात किंवा राजप्रवृत्तिमय (instinctive), (२) आर्थिक, आणि (३) धार्मिक. हे घटक स्पष्टपणे वेगळे दाखविता येतात असे मला म्हणायचे नाही; जसे ते अन्य क्षेत्रात वेगळे दाखविता येत नाहीत, तसेच ते येथेही येत नाहीत. दुकाने रविवारी बंद असतात याचे मूळ धार्मिक आहे. पण आज ही …

विवाह आणि नीती (भाग १)

बर्ट्रांड रसेल (१८७२ ते १९७०) हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ होते असे सामान्यपणे मानले जाते. तत्त्वज्ञानाखेरीज सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादि विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांचे लिखाण नेहमीच अतिशय मूलगामी, सडेतोड, निर्भय आणि विचारप्रवर्तक असे. त्यांचा Marriage and Morals (१९२९) हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध असून तो अत्यंत प्रभावीही ठरला आहे. त्यात रसेल यांनी …